सरस्वती मंदिर, तुळशीबाग रोड, रेशीमबाग, नागपूर – ४४००२४Saraswati Mandir, Tulshibaug Road, Reshimbagh, Nagpur – 440024
सरस्वती मंदिर logo — Saraswati Mandir logo

सरस्वती मंदिर, नागपूरSaraswati Mandir, Nagpurस्थापना : २१ जानेवारी १९२१ • महिलांनी चालवलेली सेवाभावी संस्थाEstd. 21 January 1921 • A charitable organisation run by women

Lt. Vaidya Badminton Coaching Centre

लेफ्टनंट वैद्य बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रLt. Vaidya Badminton Coaching Centre

आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंडोर क्रीडा केंद्रAn international-standard indoor sports centre

१९७५स्थापनाEstablished
🏸आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्टInternational-standard Courts
दिव्यांग व कर्णबधिर मुलांना मोफत प्रशिक्षणFree Training for Disabled & Deaf Children

इतिहास आणि कायापालट

१९७५ मध्ये लेफ्टनंट मनोहर वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मिळालेल्या दातृत्वाच्या देणगीतून या इंडोर बॅडमिंटन हॉलची स्थापना करण्यात आली. काळाच्या ओघात या वास्तूची मोठी दुरवस्था झाली होती. मात्र, संस्थेच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचा संकल्प सोडण्यात आला.

डॉ. विभावरी दाणी यांच्या परिश्रमांतून आणि भारतीय अंडर-१९ बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक श्री. अजय दयाल यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉलचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. आज हा हॉल एक अत्यंत देखणा, आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा केंद्राच्या रूपात उभा आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि सुविधा

  • आधुनिक पायाभूत सुविधा : खेळाडूंच्या सुरक्षिततेची आणि उत्तम कामगिरीची काळजी घेणारे अद्ययावत कोर्ट आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा.
  • तज्ज्ञ मार्गदर्शक : उदयोन्मुख खेळाडूंना योग्य दिशा मिळावी यासाठी विशेष आणि अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती.
  • भविष्यातील खेळाडूंची जडणघडण : नवोदित मुलांना बॅडमिंटनचे व्यावसायिक आणि शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारे एक प्रमुख केंद्र.

सामाजिक बांधिलकी : 'सर्वसमावेशक क्रीडा संस्कृती'

सरस्वती मंदिर संस्थेचा केवळ खेळाडू घडवण्यावरच नव्हे, तर क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्यावरही ठाम विश्वास आहे.

दिव्यांग व कर्णबधिर मुलांसाठी विशेष उपक्रम : आमच्या केंद्रामध्ये दिव्यांग आणि कर्णबधिर (मूक-बधिर) मुलांच्या क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी बॅडमिंटनचे संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाते व खेळासाठी लागणारे साहित्य संस्था स्वखर्चाने विनामूल्य पुरवते.

आमचे ध्येय

क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः दिव्यांग मुलांना, खेळाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.

History and Transformation

This indoor badminton hall was established in 1975 through a charitable donation in memory of Lt. Manohar Vaidya. Over time the building had fallen into serious disrepair. On the occasion of the institution's centenary, however, it was resolved to renovate and modernise this historic structure.

Through the efforts of Dr. Vibhawari Dani and under the guidance of Shri Ajay Dayal, coach of the Indian Under-19 badminton team, the hall has been completely transformed. Today it stands as a handsome, modern, fully equipped sports centre of international standard.

Key Features and Facilities

  • Modern infrastructure: up-to-date courts and world-class facilities that ensure players' safety and support peak performance.
  • Expert coaching: specially appointed, experienced coaches to give emerging players the right direction.
  • Shaping future players: a leading centre providing professional, scientific badminton training to young beginners.

Social Commitment: Inclusivity in Sports

Saraswati Mandir firmly believes not only in producing players, but in bringing about social transformation through sport.

Special initiative for disabled and deaf children: at our centre, complete badminton training is given free of charge to disabled and deaf (deaf-mute) children, and the institution provides all necessary sports equipment free of cost at its own expense.

Our Mission

Our chief mission is to promote excellence in sport and, through sport, to bring every section of society — especially children with disabilities — into the mainstream, building new self-confidence in them.

छायाचित्र दालनPhoto Gallery