सरस्वती मंदिर logo — Saraswati Mandir logo

सरस्वती मंदिर, नागपूरSaraswati Mandir, Nagpurस्थापना : २१ जानेवारी १९२१ • महिलांनी चालवलेली सेवाभावी संस्थाEstd. 21 January 1921 • A charitable organisation run by women

Saraswati Mandir, Nagpur

सरस्वती मंदिर, नागपूरSaraswati Mandir, Nagpur

स्त्रियांनी चालवलेली, स्त्रिया व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संस्था — स्थापना १९२१Run by women, for the all-round development of women and children — since 1921

"अबलांना सबल करावे हेच ध्येय आमुचे
उद्धरावा स्वये आत्मा ब्रीद हेच आमुचे"
"To empower those in need is our purpose.
To uplift the soul by one’s own effort is our guiding light."
१९२१1921स्थापना वर्षYear of Establishment
१००+100+वर्षांची सेवाYears of Service
7प्रमुख उपक्रमMajor Activities
१९६०1960स्वतःची वास्तूOwn Building Since
सरस्वती मंदिर, तुळशीबाग रोड, रेशीमबाग, नागपूर – ४४००२४
धर्मादाय आयुक्त नोंदणी क्र. : F-२५९(N), दिनांक : १६.०४.१९६२
Saraswati Mandir, Tulshibaug Road, Reshimbagh, Nagpur – 440024
Charity Commissioner Reg. No. F-259(N), dated 16.04.1962

संस्थेचा शतकोत्तर प्रवासA Journey of Over a Century

दिनांक २१ जानेवारी १९२१ रोजी, म्हणजेच १०० वर्षांपूर्वी, जेव्हा समाजपरिवर्तनाची अत्यंत गरज होती, अशा काळात "स्त्रियांनी चालवलेली, स्त्रिया व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी" असणारी क्रांतिकारी संस्था म्हणून 'सरस्वती मंदिर'ची स्थापना झाली.

स्थापना व प्रेरणा

१९२१ साली स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. दादासाहेब ओगले, ल. वा. परांजपे व डॉ. चोळकर यांच्या उपस्थितीत, त्यांच्या प्रेरणेतून या संस्थेची पायाभरणी झाली. श्रीमती सुंदरबाई साने या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.

ऐतिहासिक पार्श्वभूमी व उद्दिष्टे

सरस्वती मंदिरची स्थापना अशा विपरीत काळात झाली जेव्हा स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते आणि त्या औपचारिक शिक्षणापासून वंचित होत्या. स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार नसलेल्या त्या काळात महिलांमध्ये जागृती व्हावी, त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या सामाजिक जाणिवांचा विकास व्हावा, तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उदात्त हेतूने ही संस्था सुरू झाली.

सामाजिक व राष्ट्रीय योगदान

सुरुवातीच्या काळात संस्थेत अनेक विषयांवर बौद्धिक चर्चा होत असत. याशिवाय गरीब मुलांना भोजन देणे, उद्योग मार्गदर्शन करणे यांसारखे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले गेले. स्वातंत्र्य चळवळीने भारलेल्या त्या काळात, संस्थेने आपल्या परीने या राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला आणि चळवळीला मोलाची मदत केली.

प्रगती आणि स्वतःची वास्तू

कालानुरूप समाजाला आवश्यक असलेल्या अनेक नवनवीन प्रवृत्ती आणि उपक्रम संस्थेने सुरू केले. १९५८ मध्ये नागपूर सुधार प्रन्यास (NIT) कडून संस्थेसाठी जागा लीजवर घेण्यात आली आणि १९६० मध्ये संस्थेची स्वतःची देखणी इमारत बांधून तयार झाली. या हक्काच्या वास्तूतून कारभार सुरू झाल्यानंतर अनेक विस्तारवादी कल्पनांना मूर्त रूप आले.

आज ही संस्था आपल्या गौरवशाली इतिहासाचा वारसा जपत, स्वतःच्या भव्य वास्तूत मोठ्या दिमाखात उभी असून अविरत समाजसेवा करत आहे.

On 21 January 1921 — more than a hundred years ago, at a time when social reform was needed most — 'Saraswati Mandir' was founded as a revolutionary institution "run by women, for the all-round development of women and children."

Foundation and Inspiration

The institution was founded in 1921 with the inspiration and in the presence of Shri Dadasaheb Ogale, L. V. Paranjape and Dr. Cholkar of the Stri Shikshan Prasarak Mandal. Smt. Sundarbai Sane was its first President.

Historical Background and Objectives

Saraswati Mandir was established in adverse times, when women held a secondary place in society, their sphere of activity was restricted, and they were deprived of formal education. In an era when women had no right even to voice their opinions, this institution was started with the noble aim of awakening women, making them aware of their own abilities, developing their social consciousness, and helping children in their overall development.

Social and National Contribution

In its early years the institution hosted intellectual discussions on many subjects, and consistently ran social initiatives such as feeding poor children and providing vocational guidance. In those days charged with the freedom movement, the institution contributed its share to the national cause and rendered valuable help to the movement.

Progress and Its Own Building

Over time the institution launched many new initiatives that society needed. In 1958 land was taken on lease from the Nagpur Improvement Trust (NIT), and in 1960 the institution's own handsome building was completed. Once it began functioning from these premises, many ideas for expansion took concrete shape.

Today, preserving the legacy of its glorious history, the institution stands proudly in its own grand building and continues its unbroken service to society.

आमचे उपक्रमOur Activities

सरस्वती मंदिर संस्थेतर्फे चालवले जाणारे विविध उपक्रम — अधिक माहितीसाठी उपक्रमावर क्लिक करा.The various activities run by Saraswati Mandir — click any activity to know more.

Kalyan Mook-Badhir Vidyalaya

कल्याण मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयKalyan Mook-Badhir Vidyalaya and Junior College

१९६१ पासून कर्णबधिर व मूकबधिर मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय.Spreading the light of knowledge in the lives of deaf and mute children since 1961 — school and junior college.

अधिक वाचा →Read more →
Vidyawati Joglekar Library

कै. सौ. विद्यावती जोगळेकर वाचनालयLate Vidyawati Joglekar Library

१९६६ पासून कार्यरत, शासनमान्य 'ब' दर्जाचे वाचनालय — १८,००० हून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह.A government-recognised 'B' grade library functioning since 1966, with a rich collection of over 18,000 books.

अधिक वाचा →Read more →
Reading Room

अभ्यासिकाReading Room

स्पर्धा परीक्षा व अभ्यासासाठी शांत, प्रशस्त व माफक दरातील अत्याधुनिक अभ्यासिका — १०० विद्यार्थ्यांची आसनक्षमता.A quiet, spacious and affordable modern study room for students and competitive-exam aspirants — seating for 100.

अधिक वाचा →Read more →
Pramila Dani Sabhagruh

प्रमिला दाणी सभागृहPramila Dani Sabhagruh (Hall)

१५०० चौ. फुटांचे भव्य, सुसज्ज व प्रकाशमान अष्टपैलू सभागृह — मीटिंग्ज, सेमिनार्स व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी.A grand, well-equipped, well-lit 1,500 sq. ft. multipurpose hall — for meetings, seminars and cultural events.

अधिक वाचा →Read more →
Working Women's Hostel

कर्मचारी महिला वसतिगृहWorking Women's Hostel

१९७५ पासून नोकरदार महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ व किफायतशीर निवासस्थान — ३५ महिलांची सोय.A safe, clean and affordable home for working women since 1975 — accommodation for 35 women.

अधिक वाचा →Read more →
Badminton Coaching Centre

लेफ्टनंट वैद्य बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रLt. Vaidya Badminton Coaching Centre

आंतरराष्ट्रीय दर्जाचे नूतनीकृत इंडोर बॅडमिंटन केंद्र — दिव्यांग व कर्णबधिर मुलांना मोफत प्रशिक्षण.A renovated international-standard indoor badminton centre — free training for disabled and deaf children.

अधिक वाचा →Read more →

खंडोबा हनुमान देवस्थान बालवाडीKhandoba Hanuman Devasthan Balwadi

महाल भागातील मागासलेल्या वस्तीतील मुलांसाठी संस्कार व आनंददायी शिक्षण देणारी बालवाडी.A pre-school imparting values and joyful learning to children of an underprivileged locality in Mahal.

अधिक वाचा →Read more →